कृषि विस्तार अभियानांतर्गत ‘लकी ड्रॉ’व्दारे लाभार्थी निवड प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:32 PM2018-08-22T14:32:33+5:302018-08-22T14:33:34+5:30
वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे. त्यात शेतकºयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे.
वाशिम येथे २३ आॅगस्टला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रिसोड येथे २४ आॅगस्टला त्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विस्तार अभियानांतर्गत अर्ज करणाºया लाभार्थ्यांची यावेळी सोडत पद्धतीने निवड यादी व ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. याशिवाय रिसोड तालुका कृषि विभागाकडून राबविण्यात आलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अर्ज केलेल्या शेतकºयांचे अर्जही निकाली काढले जातील. त्यानुषंगाने शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिम तालुका कृषि अधिकारी देवगिरीकर यांनी केले आहे.