कृषी यांत्रिककरण उपअभियानांतर्गत लाभार्थींची सोडत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:55 PM2018-09-16T15:55:03+5:302018-09-16T15:55:13+5:30

वाशिम: जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात आहे.

Benefits of Beneficiaries under Agriculture Mechanization | कृषी यांत्रिककरण उपअभियानांतर्गत लाभार्थींची सोडत 

कृषी यांत्रिककरण उपअभियानांतर्गत लाभार्थींची सोडत 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १२ हजार ८२७ लाभार्थींची ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात यंदासाठी असलेल्या २.२१ कोटीच्या निधीतून यातील निवडक लाभार्थींना लाभ देण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकºयांची निवड करून संबंधित शेतकºयांना त्यांच्या पसंतीचे कृषीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी २ ते २.५ लाखांपर्यंतचे अनुदान कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत दिले जाणार आहे. त्यासाठी ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ या कार्यक्रमात समाविष्ट जिल्ह्यांसाठी शासनाने १३.३३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविलेली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २.२१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, जिल्ह्यातील निवडक २५ गावांमधून याकरिता १५ आॅगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत इच्छुक १२ हजार ८२७ शेतकºयांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जातून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आता लाभार्थींची निकषाच्या आधारे निवड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन संबंधित शेतकºयांना करण्यात आले आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पात्र शेतकºयांना योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी दिली. या योजनेंतर्गत निवडक शेतकºयांना ट्रॅक्टर व इतर कृषी उपयोगी अवजारे शेतकºयांना अनुदानावर देण्यात येणार आहेत. शेतकºयांची ज्येष्ठता यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.

Web Title: Benefits of Beneficiaries under Agriculture Mechanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.