प्रकल्पग्रस्त ४६६ कुटुंबांना सुविधांचा लाभ
By admin | Published: June 16, 2017 01:50 AM2017-06-16T01:50:15+5:302017-06-16T01:50:15+5:30
वाशिम : पुनर्वसित गावांच्या विकासाकरिता जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला असून, शासनाकडून प्राप्त २.२५ कोटी रुपयांच्या निधीतून ४६६ कुटुंबीयांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुनर्वसित गावांच्या विकासाकरिता जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला असून, शासनाकडून प्राप्त २.२५ कोटी रुपयांच्या निधीतून ४६६ कुटुंबीयांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत.
प्राप्त निधीतून गावठाण अंतर्गत विद्युतीकरण, विहिरीचे बांधकाम व इतरही अनेक कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्राखाली गेले असून, या गावातील ४९ कुटुंब बाधित झाली. तसेच बिबखेड हे गाव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली असून, गावातील २४८ कुटुंब बाधित झाली आहेत. दोन्ही गावांमध्ये वाढीव खर्चाच्या कामांसाठी १.१४ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून पळसखेड, बिबखेड येथे सुविधा पुरविल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.