एसटीच्या माजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा एकरकमी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:16 PM2019-02-08T15:16:40+5:302019-02-08T15:16:59+5:30

वाशिम : राज्य परिवहन महामंडाळाने ( एसटी ) त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ दिली आहे.

benefits of salary increases to former ST employees | एसटीच्या माजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा एकरकमी लाभ

एसटीच्या माजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा एकरकमी लाभ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य परिवहन महामंडाळाने ( एसटी ) त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ दिली आहे. या वेतनवाढीचा लाभ निवृत्ता, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ' किंवा इतर कोणत्याही कामामुळे सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांनाही मिळणार असून, सदर कर्मचाºयांना त्याचा एकरकमी लाभ देण्याचे निर्देश महामंडळाने ५ फेब्रुवारीच्या परिपत्रकान्वये दिले आहेत.
एसटी महामंडळाने त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ लागू केली असून, याचा लाभ कार्यरत कर्मचाºयांना मिळणार आहे. त्याशिवाय निवृत्त, स्वेच्छानिवृत्त, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदि कारणांमुळे सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांना या वेतनवाढीनुसार त्यांच्या देय रकमा अदा करण्याबाबत ६ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार सुचनाही देण्यात आल्या आहेत. या रकमा अदा करण्यासाठी महामंडळाने नव्याने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यात कोणत्याही कारणास्तव एसटीच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºया कर्मचाºयांना वेतनवाढीमुळे रजा रोखीकरण आणि उपदानातील फरक एकरकमी देणे, वेतनवाढीतील फरक हा कर्मचारी वर्ग खाते अन्वये सेवेत असणाºया कर्मचºयांप्रमाणेच समान ४८ हफ्त्यांत परिगणना करून त्यापैकी ५ हफ्त्यांची रक्कम तात्काळ अदा करण्यासह महामंडळाच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंशदान रकमेतील फरक समान ४८ हफ्त्यांत वेतनाच्या फरकासोबत अदा करण्याच्या सुचनांचा समावेश होता. आता त्यात सुधारणा करून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदि कारणांमुळे महामंडळाच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांना महामंडळाच्या या संदर्भात २०१८ मधील परिपत्रक क्रमांक २७ नुसार वेतनवाढीमुळे रजा रोखीकरण आणि उपदानातील व वेतनातील फरक, तसेच भविष्य निर्वाह निधी अंशदान रकमेतील फरक हा कर्मचारी वर्ग खाते क्रमांक ३५/२०१८ व ४१/२०१८ अन्वये परिगणना करून एकरकमी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच वरील कर्मचाºयांना यापूर्वी हफ्याने अदा करण्यात आलेली रक्कम समायोजित करून उर्वरित सर्व देय रक्कम ही एकरकमी देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: benefits of salary increases to former ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.