शेतमाल तारण योजनेचा ११९ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:16 PM2018-12-26T14:16:21+5:302018-12-26T14:17:09+5:30

मानोरा  : जिल्हयातील मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्गंत तालुक्यातील ११९ शेतकºयांना लाभ मिळवून दिला.

Benefits of Taran scheme to 119 farmers | शेतमाल तारण योजनेचा ११९ शेतकऱ्यांना लाभ

शेतमाल तारण योजनेचा ११९ शेतकऱ्यांना लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : जिल्हयातील मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्गंत तालुक्यातील ११९ शेतकºयांना लाभ मिळवून दिला. जवळपास १ कोटी रुपयांचा माल तारण ठेवून ७७ लाख रुपयांचे शेतकºयांना कर्ज वाटप करण्यात आले.
 मानोरा बाजार समितीने शेतमाल तारण योजनाबाबत शेतकºयांना माहिती देत,  सदर योजनचा प्रचार ,प्रसार करुन  तालुक्यातील ११९ शेतकºयाना त्यांचा १ कोटी २ लाख रुपये किंमतीचा सोयाबीन हा  शेतमाल तारण ठेवुन ७६ लाख ७५ हजार रुपये कर्ज वाटप केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत समिती चारपटीने शेतकºयांना लाभ देण्यास यशस्वी झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे ही योजना राबविण्यात येत., सदर योजनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वनिधीमधून तारण कर्ज वाटप करावे लागते.  वाटप केलेल्या कर्जाचा प्रतिपुर्ती प्रस्ताव सादर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून सदर रक्कम समितीला कर्ज  स्वरुपात मिळते. योजनेमध्ये बाजारभावाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.  ज्याचा व्याज दर फक्त ६ टक्के वार्षीक आकारल्या जातो. तसेच समितीकडून कोणत्याही प्रकारचे गोदाम भाडे घेतले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचे इतर शुल्क सुध्दा नाही. शेतकºयाला पैशाची गरज असतांना जर शेतमालाला भाव कमी असेल तेव्हा इच्छा नसतांना आपला शेतमाल कमी भावाने विक्री करावा लागतो,  अशी वेळी शेतकºयांचे नुकसान होवू  नये याकरिता सदर योजना राबविली जाते. ज्यामुळे  शेतकºयाला आपला शेतमाल कमी भावाने न विकता पैसे सुध्दा उपलब्ध होतात. समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकºयानी शेतमालाला कमी भाव मिळत असल्यामुळे  आत्महत्यांना करता समिती राबवत असलेल्या पणन मंडळाच्या सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या संचालक मंडळाच्यावतीने सभापती हरसिंग चव्हाण तसेच उपसभापती राजेश नेमाने  यांनी केले आहे.

Web Title: Benefits of Taran scheme to 119 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.