‘क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग’मध्ये वाशिम पोलीस दलाचे उत्कृष्ट कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:13 AM2017-09-21T01:13:34+5:302017-09-21T01:14:33+5:30

वाशिम: संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात १ जानेवारी  २0१६ पासून ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँण्ड क्रिमिनल  ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीची अंमलबजावणी सुरू  करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाने उ त्कृष्ट कार्य केल्याप्रती पोलीस महासंचालकांच्या हस्ते  विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विशेष  पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Best work of the Washim police force in 'Crime and Criminal Tracking' | ‘क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग’मध्ये वाशिम पोलीस दलाचे उत्कृष्ट कार्य

‘क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग’मध्ये वाशिम पोलीस दलाचे उत्कृष्ट कार्य

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मानपोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात १ जानेवारी  २0१६ पासून ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँण्ड क्रिमिनल  ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीची अंमलबजावणी सुरू  करण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाने उ त्कृष्ट कार्य केल्याप्रती पोलीस महासंचालकांच्या हस्ते  विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विशेष  पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
‘सीसीटीएनएस’ प्रणालीअंतर्गत पोलीस विभागात चालणारी  दैनंदिन कामे, गुन्हे अन्वेषण, न्यायालयीन कामकाज  ‘ऑनलाइन’ करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात मूलभूत  सुविधांचा अभाव, ग्रामीण भागातील विजेचे भारनियमन,  इंटरनेट कनेक्टिव्हीटीमधील असुविधा आदी प्रतिकूल  बाबींवर मात करत जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील  यांनी जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर सीसीटीएनएस  कामकाजावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून त्यात जास्तीत  जास्त सुधारणा घडवून आणण्याकरिता कर्मचार्‍यांना प्रो त्साहित करण्यात आले. तसेच सीसीटीएनएसची अधिक  प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून जनतेमध्येदेखील  सिटीजन पोर्टलची प्रसिद्धी करण्यात आली. यास्तव शाळा व  महाविद्यालयात प्रबोधनपर शिबिरे घेण्यात आली. 
संगणक वापराकडे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना  आकर्षित करण्यासाठी सेवाकालीन प्रशिक्षण शिबिरे,  कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पोलीस स्टेशन  भेटीदरम्यान सीसीटीएनएस कामकाजाचा आढावा घेऊन प्र त्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. याचीच  फुलश्रृती  म्हणून  संपूर्ण महाराष्ट्रातून वाशिम जिल्हा तिसर्‍या क्रमाकांचा  मानकरी ठरला आहे. या कामगिरीबाबत १८ सप्टेंबर रोजी  पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते जिल्हा  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा पारितोषिक देऊन स त्कार करण्यात आला. सीसीटीएनएस कार्यप्रणाली यशस्वी  करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सायबर  सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख,  प्रदीप डाखोरे व  कर्मचारी अमोल काळमुंदळे, अश्‍विनी पन्नासे, कोमल गाढे,  विप्रो  कंपनीचे  प्रवक्ते राजेश शिकवाल यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Best work of the Washim police force in 'Crime and Criminal Tracking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.