‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:51 AM2017-10-16T01:51:49+5:302017-10-16T01:52:49+5:30

वाशिम: ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते  १४ ऑक्टोबरदरम्यान वाशिम जिल्हय़ात जनजागृतीपर सप्ताह  राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी  बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली.

'Beti Bachao-Beti Padhao' pledge! | ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा!

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा!

googlenewsNext
ठळक मुद्देसप्ताहाचा समारोप शाळा-अंगणवाडीत विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते  १४ ऑक्टोबरदरम्यान वाशिम जिल्हय़ात जनजागृतीपर सप्ताह  राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी  बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली.
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात व्यापक जनजागृती  करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी  अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस,  महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी  अधिकारी दिलीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात ९ ते १४ ऑ क्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. १0 ऑ क्टोबरला प्रभातफेरी, ११ ऑक्टोबरला मुलीच्या जन्माचे स्वागत  व पालकांचे अभिनंदन, मुलींच्या नावे वृक्षारोपण, १३ ऑ क्टोबरला आरोग्य व पोषण यासंदर्भात जनजागृती, विविध  माध्यमातून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यात आला.  १४ ऑक्टोबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या सप्ताहाचा समारो प करण्यात आला. प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात  बेटी बचाओ-बेटी पढाओची प्रतिज्ञा घेण्यात आली. वाशिम ये थील जिल्हा परिषदेच्या सभागृहात अंगणवाडी सेविका, मद तनीस यांनी प्रतिज्ञा घेतली तर शाळा, अंगणवाडीत विद्यार्थ्यांना  माहिती देण्यात आली. उमरा कापसे, पिंपळगाव, सापळी,  सावरगाव, उकळीपेन, टो यासह ग्रामीण भागात ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वाशिमचे  बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, अभियानाचे  जिल्हा समन्वयक रूपेश निमके, विस्तार अधिकारी तुषार  जाधव यांच्यासह जिल्हय़ातील सर्व बालविकास प्रकल्प  अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जि.प. शाळेचे  शिक्षक आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: 'Beti Bachao-Beti Padhao' pledge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.