फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:14+5:302021-05-19T04:42:14+5:30

वाशिम : ‘फेक फेसबुक’ अकाउंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत ...

Beware if money is demanded from Facebook! | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान !

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान !

Next

वाशिम : ‘फेक फेसबुक’ अकाउंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दोन नामांकित राजकीय पदाधिकाऱ्यांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सावध राहा, फेक फेसबुकवरून पैशांची मागणी झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

एकमेकांशी संपर्क साधण्याचे साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र, ही मैत्री कधी-कधी खूप महागात पडते. तसेच मेसेंजर हॅक करून त्या मेसेंजर युझरच्या अकाऊंटवरून पैशाची मागणीही केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप देशमुख यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून हॅकरने मेसेंजरच्या माध्यमातून फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. कॉंग्रेसचे युवा नेते शंकर वानखेडे यांचेदेखील मेसेंजर हॅक करून हॅकरने मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. याप्रमाणेच इतरही काही प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने सर्वांनी सावध होणे आवश्यक ठरत आहे. फेक प्रोफाईल बनवूनदेखील पैशांची मागणी होऊ शकते. तेव्हा फेसबुक, मेसेंजरचा वापर करताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे. शक्यतोवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये किंवा एखाद्या मित्राचे मेसेंजर हॅक झाले आणि त्यावरून पैशाच्या मागणीचा संदेश आला तर सर्वप्रथम संबंधित मित्राशी फोनद्वारे संपर्क साधून पडताळणी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

०००००००००

फेक अकाउंट बनवून फसवणूक !

फेक अकाउंट बनवून फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. तेव्हा अधिक सावध राहणे आवश्यक आहे. ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे, त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून बनविलेली फेक प्रोफाईल शोधावी. ज्या मित्रांना प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली, त्यांच्याकडून फेक प्रोफाईलची लिंक (यूआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाईलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्यासमोर फाईन्ड सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाईल हे ऑप्शन येतील. त्यँवर क्लिक करा. प्रिटेंडिंग टु बी समवन हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. मी अ फ्रेन्डस आणि सेलेब्रिटी. त्यावरील मी ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

०००००००

बॉक्स

अशी घ्या काळजी !

स्वत:ची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर हू कॅन युवर फ्रेंड लिस्टवर जाऊन ओनली मी करा. स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी किंवा डाऊनलोड करू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रोफाईल लॉगइनवर जाऊन लॉक युवर प्रोफाईल करा. अनोळखीने फ्रेंड रिक्वेस्ट करू नये, याकरिता सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंगमधील फ्रेंड ऑफ फ्रेंड करावे. स्वत:चा फेसबुक अकाउंनट सुरक्षित ठेवण्याकरिता सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटी ॲण्ड लॉगइनवर क्लिक करून ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे. फेसबुकवरील आपला मोबाईल क्रमांक दिसू नये, याकरिता सेटिंगमधील प्रायव्हसी सेटिंगवर क्लिक करून हू कॅन लुक यू अप युजिंग फोन नंबर यू प्रोव्हाईडवर जाऊन ओन्ली मी हे ऑप्शन क्लिक करावे. यामुळे फेसबुक अकाऊंट सुरक्षित करता येईल.

000

Web Title: Beware if money is demanded from Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.