रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:55+5:302021-09-22T04:45:55+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : वाहन रस्त्यात उभे करुन बाजुला उभे राहणे, आपल्या वाहनाला येऊन धडक देणे व नंतर रस्त्यावर ...
नंदकिशोर नारे
वाशिम : वाहन रस्त्यात उभे करुन बाजुला उभे राहणे, आपल्या वाहनाला येऊन धडक देणे व नंतर रस्त्यावर वाद घालून पैशाची मागणी करण्याचे प्रकारात गत काही दिवसांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. रस्त्यावर विनाकारण काेणी वाद घालत असेल तर अशा नागरिकांपासून सावध राहणे गरजेचे झाले आहे.
वाशिम शहर परिसरात अनेक अशा टाेळ्या निर्माण झाल्या असून वाहनचालकाची चूक नसताना त्याची चूक असल्याचे भासवून रस्त्यावर वाद घालणे, लाेेकांना जमा करणे व पैसे उकळल्या जात आहेत. सर्वसामान्य माणूस वाद नकाे म्हणून यातून सुटका करण्यासाठी पैसे देऊन माेकळा हाेत आहे. काही जण तर चक्क पाेलीस स्टेशनमध्ये तक्रारी करीत असल्याने सर्वसामन्यांची डाेकेदुखी वाढली आहे. याकडे पाेलीस प्रशासनाने लक्ष देऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरातील अकाेला नाका, पुसद नाका, हिंगाेली नाका परिसरात हा प्रकार दिसून येताे.
...
अकाेला रस्त्यावर अनेकांकडून घेतले पैसे
आपले वाहन रस्त्याच्या मधात ठेवावे व जराही धक्का लागला तर वाद घालून वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार अकाेला रस्त्यावर घडलेले आहेत. वाद नकाे, पाेलिसांची झंझट नकाे म्हणून अनेकांनी पैसे देऊन माेकळे झाल्याने या प्रकारात वाढ हाेत आहे.
पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या
रस्त्यात वाहने उभी करुन विनाकारण वाद घालणे किंवा स्वत:हून आपल्या वाहनाला धडक देणे व नंतर माझ्या वाहनाचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी वाद घालणे किंवा पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
जांभरुण फाट्याजवळ रविवारी एका माेटारसायकलस्वाराने आपले वाहन रस्त्याच्या मधात ठेवले. रात्रीची वेळ असल्याने चारचाकी वाहनचालकास ते न दिसल्याने धडक झाली. अजूनही ते वाहन सेटलमेंट न झाल्याने तेथेच आहे.
काय काळजी घ्या?
रस्त्यावर काही कारण करुन काेणी वाद घालत असेल तर शक्यताेवर त्याचे एकूण घ्यावे व त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. तरीही काहीही न ऐकता पैशाची मागणी करीत असल्यास पाेलिसांत तक्रार करावी. अन्यथा आपली फसवणूक हाेऊ शकते.