खबरदार, विनाकारण घराबाहेर पडाल तर ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:56 AM2021-04-15T11:56:35+5:302021-04-15T11:57:11+5:30

Washim News: कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला आणि पाेलिसांच्या दंड्याला सामोरे यरे जावे लागणार आहे.

Beware, if you fall out of the house for no reason ..! | खबरदार, विनाकारण घराबाहेर पडाल तर ..!

खबरदार, विनाकारण घराबाहेर पडाल तर ..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून सुरू केली असून, प्रमुख ठिकाणी व चौकांत चोख बंदोबस्त ठेवला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडले तर प्रशासनाच्या कारवाईला आणि पाेलिसांच्या दंड्याला सामोरे यरे जावे लागणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. १ मे राेजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून, जिल्ह्यात या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गत काही दिवसांपासून दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी होती. आता पूर्णवेळ कडक निर्बंध राहणार असून, अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवली जाणार असून, चोरी-छुपे दुकानांत खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.


जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने सुरू करण्यास मनाई आहे. व्यापारी, नागरिकांनी संचारबंदीच्या नियमाचे पालन करून कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम


संचारबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून प्रमुख ठिकाणी व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण कुणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
 

Web Title: Beware, if you fall out of the house for no reason ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम