लॉटरी लागल्याचे ई -मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:37+5:302021-08-18T04:48:37+5:30

वाशिम : आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा इ-मेल आल्यास आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता ...

Beware of lottery e-mails or messages! | लॉटरी लागल्याचे ई -मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

लॉटरी लागल्याचे ई -मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

Next

वाशिम : आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा इ-मेल आल्यास आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेल विभागाच्यावतिने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वेळाेवेळी हाेत असलेल्या जनजागृतीमुळे अशा घटना घडलेल्या नसल्या तरी इतर ठिकाणी घडत असलेल्या घटना पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच असा मॅसेज किंवा फाेन आल्यास संपर्क करावा.

..............

फिशिंग ई मेल

एखाद्या कंपनीच्या नावाने इ-मेल्स किंवा मेसेज पाठविले जातात. (फिशिंग इमेल) असे मेल ओपन करून त्यांना प्रतिसाद देणे टाळणे गरजेचे आहे. अन्यथा आपला पासवर्ड , पीन चाेरी करून फसवणूक केल्या जाऊ शकते.

..........

ही घ्या काळजी

एखाद्या बनावट कंपनीच्या नावाने फिशिंग मेल पाठविल्या जातेा. त्यामध्ये ‘खूश खबर! आपण १० लाखाची लाॅटरी जिंकली’ असे प्रलाेभन देण्यात येते. यापासून सावधान रहावे,

असा काेणत्याही प्रकारचा मेल आल्यास त्याची शहनिशा करणे गरजेचे आहे. अन्यथा फसवणूक हाेऊ शकते.

लाॅटरी लागली, असा मॅसेज किंवा फाेन आल्यास काेणत्याही प्रकारची माहिती देण्याचे टाळावे, तसेच शंका असल्यास सायबर सेलकडे तक्रार नाेंदवावी.

............

वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली आहे का ?

वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरू झाली आहे का, हे सर्वात आधी तपासून मेल चेक करणे गरजेचे आहे.

वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरू झाली नसल्याने आपली फसवणूक हाेत असल्याचे लक्षात घेऊन मेल ओपन करणे टाळावे.

.............

लाटरी लागली म्हणून जिल्ह्यात फसवणूक नाही

वाशिम जिल्ह्यात सायबर सेल विभागाकडून सायबर गुन्ह्यांसंदर्भात वेळाेवेळी शिबिरे, मार्गदर्शन करण्यात येत असल्याने लाॅटरी लागली म्हणून जिल्ह्यात फसवणूक झाल्याचे एकही प्रकरण नाही. नागरिकांनी लाॅटरी लागली, असे मॅसेज आल्यास सावधानता बाळगावी.

आपल्याला लाॅटरी लागली आहे, असा मॅसेज किंवा इ-मेल आल्यानंतर अनेक शहरांमध्ये माेठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यापासून सावध राहण्यासाठी काेणत्याही फेक मॅसेज, ई-मेलला थारा देऊ नये, असे आवाहन सायबर सेलचे अजय वाढवे यांनी केले.

Web Title: Beware of lottery e-mails or messages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.