वाशिमच्या ‘भाग्यश्री’चा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:03 PM2018-08-11T18:03:44+5:302018-08-11T18:05:30+5:30
वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई आयआयटी संस्थेच्या ५६ व्या पदवीदान सोहळ्यात हे पदक तिला बहाल करण्यात आले. भाग्यश्रीच्या यशामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवल्या गेला आहे.
आयआयटी मुंबईचा ५६ वा पदवीदान समारंभ शनिवार ११ आॅगस्ट रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. या समारंभात आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करून गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाºया विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीनीचा समावेश होता. भाग्यश्रीने सिस्टिम अॅण्ड कंट्रोल या विषयात ९७.०३ टक्के गुण प्राप्त करीत या विषयात अव्वल स्थान पटकावले. आयआयटीमध्ये ती दुसºया क्रमांकाची मानकरी ठरली. याबद्दल संस्थेच्यावतीने तिची रौप्यपदकासाठी निवड करण्यात आली होती. भाग्यश्री ही वाशिम येथील उद्योजक किरण सोमाणी आणि अभया किरण सोमाणी या दाम्पत्याची यांची कन्या आहे. तिने प्राथमिक शिक्षण श्रीमती मुळीबाई चरखा कॉन्व्हेंटमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण वाशिम येथीलच राजस्थान आर्य महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर तिने पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर उच्च पदवीसाठी मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला.