जनुना येथील भजनी मंडळ प्रथम, विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 02:58 PM2018-02-14T14:58:25+5:302018-02-14T14:59:05+5:30

मंगरुळपीर तालुक्याचे आराध्य ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज यांचे यात्रोत्सवाचे औचित्य साधुन  संत अच्युत महाराज भजनी मंडळ मंगरुळपीरचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जनुना येथील राष्ट्रसंत भजन मंडळाने पटकाविले

Bhajan competition in Washim | जनुना येथील भजनी मंडळ प्रथम, विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धा  

जनुना येथील भजनी मंडळ प्रथम, विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धा  

Next

मंगरुळपीर (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्याचे आराध्य ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज यांचे यात्रोत्सवाचे औचित्य साधुन  संत अच्युत महाराज भजनी मंडळ मंगरुळपीरचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जनुना येथील राष्ट्रसंत भजन मंडळाने पटकाविले. 

संत बिरबलनाथ मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्य संपन्न झालेल्या विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सुरेश लुंगे तर उदघाटक म्हणुन विठ्ठलराव गावंडे यांची होते. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हासेवाधिकारी सुनिल सपकाळ, कृषी उत्पन बाजार समितीचे सचिव बाळु पाटील, रविंद्र वार्डेकर, जयंत जहागिरदार, रमेश पाटील खाडे, सिताराम महाराज, वाशीम  जिल्हाप्रचारक साहेबराव पाटील, जिल्हा सचीव डॉ.सुधाकर क्षीरसागर, किशोर पंडीत,विजय पंडीत, जुगल बियाणी,  रामकुमार रघुवंशी, नगरसेवक पुरुषोत्तम चितलांग यांचेसह श्री गुरुदेव प्रेमिंची उपस्थिती होती.  प्रथम क्रमांकाचे मानकरी जनुना येथील राष्ट्रसंत भजन मंडळाला अकरा हजार रुपय, व्दितीय बक्षिस दहा हजार रुपये यवतमाळ येथील महाराणा प्रताप भजन मंडळाला,तृतिय  वणी वागदरा येथील हर्षवर्धन भजन मंडळाला नउ  हजार रुपये, चतुर्थ बक्षिस अखिल भारतीय भजन मंडळ घाटंजी यांना आठ हजार रुपये असे विदभार्तील एकुण एकवीस भजनी मंडळाना अनुक्रमे बक्षीस  प्रायोजकांच्या हस्ते  वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर यांनी तर कार्यक्रमाचे संचालन गजानन गिर्डेकर यांनी केले. आभार प्रदर्शन बाळु दिवेकर यांनी  केले. भजन स्पधेर्ची सुरुवात  वार्डेकर यांनी गायिलेल्या सामुदायिक प्रार्थनेने व गोपाल क्षीरसागर यांनी गायिलेल्या ‘हर देश मे तु हर भेष मे तु ’ या भजनाने करण्यात आली. विदर्भस्तरिय भजन स्पर्धेला विदर्भातील भजनी मंडळांनी व शहरातील श्रोत्यांनी दाद दिली. आयोजकातर्फे भजनीमंडळाकरिता भोजन, चहा, नाश्त्याची व्यवस्था  करण्यात आली होती.

Web Title: Bhajan competition in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.