भर ते मोहजाबंदी रस्ता डागडुजीचे काम थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:32+5:302021-02-06T05:17:32+5:30

भर जहागिर ते मोहजाबंदी हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. दिवंगत मंत्री स्व. सुभाष झनक यांच्या प्रयत्नातून तालुक्याच्या सीमेपर्यंत ...

Bhar to Mohajabandi road repair work Thaturmatur | भर ते मोहजाबंदी रस्ता डागडुजीचे काम थातूरमातूर

भर ते मोहजाबंदी रस्ता डागडुजीचे काम थातूरमातूर

Next

भर जहागिर ते मोहजाबंदी हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. दिवंगत मंत्री स्व. सुभाष झनक यांच्या प्रयत्नातून तालुक्याच्या सीमेपर्यंत जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. सदर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम उपविभागाने दोन वर्षांसाठी ११.३३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याला सुमारे ३५ लाखांच्या निधीद्वारे रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला प्रारंभ केला. मात्र, कंत्राटदाराकडून रस्ताकामाची डागडुजी थातूरमातूर पद्धतीने होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावरील खड्यांतील माती साफ करून डांबर टाकणे, त्यावर डांबर टाकून दहा एम.एम. गिट्टी टाकणे, प्रत्येक थरावर दबाई करणे अनिवार्य असताना डागडुजीमधील डांबर गायब झाले आहे. प्रत्येक खड्ड्यात माती जशीच्या तशीच ठेवली जात आहे.

................

कोट :

सदर रस्ता डागडुजीचे काम दर्जेदार करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. रस्त्यावरील खड्ड्यातील माती काढून अंदाजपत्रकानुसार काम करणे आवश्यक आहे. या कामाला भेट देऊन चौकशी करण्यात येईल.

अक्षय गोहाड

सहायक अभियंता, सा. बां. विभाग, रिसोड

Web Title: Bhar to Mohajabandi road repair work Thaturmatur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.