भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे
By admin | Published: July 15, 2017 01:55 AM2017-07-15T01:55:29+5:302017-07-15T01:55:29+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकाश आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मध्य प्रदेशमधील महू येथे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ५ जुलै रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजेच बहुजन चळवळ संपविण्याचा कट असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी यांनी केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात भारिप व बौद्ध महासभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला जिल्हा निरीक्षक एस.बी खंडारे, संध्याताई पंडित, पी.एस. खंडारे, कळासरे, राजू दारोकार, डॉ. रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, अनंत तायडे, विजय मनवर, अॅड. मारुफ खान, कारंजाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम.टी. खान, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, राजाभाऊ चव्हाण, नीलेश भोजने आदींसह जिल्हाभरातील भारिप-बमसं पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.