बियाणे, खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:56+5:302021-06-17T04:27:56+5:30
वाशिम : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळा बाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हा आणि तालुकास्तरावर ...
वाशिम : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळा बाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींची तपासणीसुद्धा या पथकांकडून केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली आहे.
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते व कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेली भरारी पथके आवश्यक कारवाई करतील. कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी या नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संपर्क साधता येईल, असे तोटावार व बंडगर यांनी सांगितले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात असून, यामध्ये कृषी उपसंचालक एन. आर. ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी सी. पी. भागडे, ग्रामविकास अधिकारी एस. के. इंगळे, तर उपविभागीय स्तरावरील कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्षात तंत्र अधिकारी पल्लेवाड, कृषी सहाय्यक एन. एस. धांडे यांचा समावेश आहे.
००
तालुकास्तरीय पथकात यांचा आहे समावेश
वाशिम तालुका पथकात तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, कृषी सहाय्यक संगीता टाकरस, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. पी. भद्रोड, विस्तार अधिकारी ए. एस. मुळे यांचा समावेश आहे. मालेगाव तालुका - तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, कृषी अधिकारी एस. एल. अवचार, कृषी सहाय्यक मानवतकर, विस्तार अधिकारी बी. एन. ठाकरे, रिसोड तालुका - तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, कृषी अधिकारी रवींद्र धनेकर, कृषी अधिकारी आर. एन. जोशी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गावंडे. मंगरुळपीर तालुका - तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, कृषी अधिकारी आकाश इंगोले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एस. शेळके, विस्तार अधिकारी आर. बी. वाडणकर. मानोरा तालुका- तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के, कृषी पर्यवेक्षक एस. एन. मनवर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एस. मकासरे, विस्तार अधिकारी. कारंजा तालुका - तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी अधिकारी प्रमानंद राऊत, पंचायत समिती, कारंजाचे कृषी अधिकारी पी. एस. देशमुख, विस्तार अधिकारी एस. व्ही. कोल्हे यांचा समावेश आहे.