Bharat Bandh : मंगरुळपिर शहरात संमिश्र; ग्रामीण भागात 'रास्ता रोको '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:29 PM2020-12-08T15:29:18+5:302020-12-08T15:29:42+5:30

Bharat Bandh: ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.

Bharat Bandh: Composite in Mangrulpir city; 'Chakka-jam' in rural areas |  Bharat Bandh : मंगरुळपिर शहरात संमिश्र; ग्रामीण भागात 'रास्ता रोको '

 Bharat Bandh : मंगरुळपिर शहरात संमिश्र; ग्रामीण भागात 'रास्ता रोको '

Next

मंगरुळपिर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी  ८ डिसेबरला भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.बदला मंगरुळपिर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.
            केंद्र सरकारने केलाल नवीन कृषि कायदा रद्द करण्यात  यावा या मागणीसाठी मंगळवारी  विविध संघटनांनी व पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला मंगरुळपिर शहरात व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता.  तर तालुक्यातील शिवणी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठलराव गावंडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दिडतास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती. यामध्ये सरपंच लल्लू गारवे, मोहम्मद गारवे,हसन गारवे,निलेश चव्हाण, दत्ता खडीकार यांचेसह अनेकजण सहभागी होते . तहसीलदार व ठाणेदार यांचेशी चर्चा करून चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. तर धानोरा फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व धानोरा खुर्द परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आर. के . राठोड ,पंचायत समितीचे सदस्य अनंत शेळके,सुभाष कावरे,विजय जाधव,अकबर पटेल, जावेद भाई,खेमसिंग राठोड सरपंच, दत्ता चारखोड, बाळू चरखोड, सुभाष राठोड, गौतम खडसे, दादाराव खडसे, सतीश खडसे, गबर राठोड, काशीराम चव्हाण, हरिभाऊ धानोरकर, सुरेश राठोड विशाल धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,मंगेश धानोरकर ,दिनेश चव्हाण, अमोल धानोरकर, नूतन ताई राठोड राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, यांच्यात करण्यात आले तर शेलुबाजार येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग कोठाळे, दौलत इंगोले,सचिन डोफेकर यांनी काही तास व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करून भारत बंद ला आपला पाठिंबा दर्शवीला यावेळी मंगरुळपिर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपिर चे ठाणेदार, आसेगाव चे ठाणेदार यांनी मंगरुळपिर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवला.

Web Title: Bharat Bandh: Composite in Mangrulpir city; 'Chakka-jam' in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.