गटविकास अधिकारी म्हणून भारसाकळे रूजू

By admin | Published: June 2, 2017 07:20 PM2017-06-02T19:20:33+5:302017-06-02T19:20:33+5:30

रिसोड - रिसोड पंचायत समितीचे नियमित गटविकास अधिकारी म्हणून शिवशंकर भारसाकळे यांनी शुक्रवारी सूत्रे स्विकारली. गत दीड वर्षापासून सदर पद रिक्त होते.

Bharatakale Ruju as Group Development Officer | गटविकास अधिकारी म्हणून भारसाकळे रूजू

गटविकास अधिकारी म्हणून भारसाकळे रूजू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - रिसोड पंचायत समितीचे नियमित गटविकास अधिकारी म्हणून शिवशंकर भारसाकळे यांनी शुक्रवारी सूत्रे स्विकारली. गत दीड वर्षापासून सदर पद रिक्त होते.
जानेवारी २०१६ पासून रिसोड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून दिगांबर मकासरे, व्ही. पुजारी, शृंगारे यांनी कामकाज पाहिले. आता नियमित गटविकास अधिकारी म्हणून भारसाकळे रूजू झाले आहेत. भारसाकळे यांनी यापूर्वी मंत्रालयात गृह विभागात कक्ष सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही सेवा दिलेली आहे. तसेच गडचिरोली पंचायत समिती येथे पाच वर्षे गटविकास अधिकारी म्हणून सेवा दिलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन विकासात्मक कामांना चालना देण्याचा प्रयत्न राहिल, असे मत भारसाकळे यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Bharatakale Ruju as Group Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.