रिसोड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी भारिप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:06 PM2018-02-08T16:06:13+5:302018-02-08T16:08:44+5:30
रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे. याबाबत तहसीलदारांकडे निवेदन सादर करून येत्या १० दिवसांत ही प्रकरणे निकाली न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्यावतीने देण्यात आला आहे.
तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी नवी शिधापत्रिका मिळणे, शिधापत्रिका विभक्त करणे , शिधापत्रिकेत नवे नाव जोडणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे,शिधापत्रिका आॅनलाइन करणे आदिंसाठी निवेदन सादर केले आहे. तथापि, ही प्रकरणे निकाली काढण्यास विलंब लागत असल्याने सर्वसामान्य, गोर गरिब, जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत भारिप बहुजन महासंघ रिसोड शहर व तालुकाच्यावतीने शहर अध्यक्ष प्रदिप वसंतराव खंडारे यांच्या नेतृत्वात रिसोडच्या तहसिलदारांना रिसोड शहरासह तालुक्यातील शिधापत्रिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले व शिधापत्रिकांशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. येत्या १० दिवसांत ही प्रकरणे निकाली काढण्यात आली नाही, तर भारिप बहुजन महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशाराही या निवेदनातून आला. यावेळी केशवराव संभादिडे, शे.खाजा भाई, अब्दुल मुनाफ, विजय सिरसाट, विश्वनाथ पारडे, डाँ.रविंद्र मोरे पाटील, मुनव्वर खत्री, अर्जुन डोंगरदिवे, प्रदिप खंडारे, गौतम धांडे व भारिप बहुजन महासंघ रिसोड शहर व तालुक्यातील कार्यकरते उपस्थित होते.