विविध मागण्यांसाठी भारिप-बमसंचे वाशिम तहसिल कार्यालयावर धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:03 PM2018-03-03T14:03:50+5:302018-03-03T14:03:50+5:30
वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणातील आंबेडकरी अनुयायी, युवक व निरपराधांविरूद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावे, दंगलीसाठी जबाबदार असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३ मार्च रोजी भारिप-बमसंच्यावतीने तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणातील आंबेडकरी अनुयायी, युवक व निरपराधांविरूद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावे, दंगलीसाठी जबाबदार असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३ मार्च रोजी भारिप-बमसंच्यावतीने तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
भारिप-बमसंतर्फे देण्यात आलेल्या निवदेनात नमूद आहे की, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील दंगलीस जबाबदार असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. एकबोटे व भिडे यांना अटक करण्यात यावी तसेच कोरेगाव भीमा दंगलीनंतर राज्यभरात ३ जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. या आंदोलनात सहभागी आंबेडकरी अनुयायी, युवक व नागरिकांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोम्बींग आॅपरेशन राबवून त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे अटक करून तुरूंगात डांबून ठेवण्यात आले. राजकीय व सामाजिक आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याची तरतूद असलेले अनेक शासन निर्णय असून, त्या अनुषंगाने गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरेगाव भीमा येथे अभिवादनाकरिता आलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली तर काही वाहने जाळून टाकण्यात आली. याप्रकरणी मालमत्तांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, महागाई निर्देशांकाप्रमाणे भारत सरकार शिष्यवृत्ती ही उत्पन्नानुसार सरसकट पाच लाख रुपये करून सदर शिष्यवृत्ती सर्व प्रवर्गास लागू करण्यात यावी, विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता दरमहा १५०० रुपये करण्यात यावा, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसिलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले. वाशिम येथे भारिप-बमसंचे जिल्हा महासचिव डॉ. नरेशकुमार इंगळे, ज्येष्ठ सल्लागार मधुकर जुमडे यांच्यासह पी.एस. खंदारे, अनंत तायडे, प्रल्हादराव इंगोले, वि.रा. मनवर, हरिदास बनसोड, राजीव दारोकार, प्रल्हाद वाणी, नारायण चव्हाण, सुधाकर इंगोले, दत्ता वानखडे, जे.एस. शिंदे, वसंतराव हिवराळे, बालाजी गंगावणे, प्रवीण पट्टेबहादूर, समाधान भगत, उमेश् राऊत, किसन इंगोले, नागसेन पट्टेबहादूर, वसंतराव राठोड, रवी पट्टेबहादूर, राज जाधव, संजय कांबळे, भूषण मोरे, किशोर पट्टेबहादूर, भालचंद्र तायडे, आत्माराम भगत यांच्यासह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.