भारिप-बमसंचे ‘आॅपरेशन क्लीन’; निष्क्रिय पदाधिका-यांना दाखविला घरचा रस्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:24 PM2017-11-29T18:24:32+5:302017-11-29T18:26:52+5:30
कारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला. कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्स येथील उपजिल्हा कार्यालयात २८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या समिक्षा बैठकीत विविधांगी बाजूने चर्चा करण्यात आली.
भारिप बहुजन महासंघामध्ये निष्क्रियपणे काम करणाºया वाशिम जिल्ह्यातील कार्यकारणीतील पदाधिकाºयांचे लवकरच खांदेपालट करण्याचे सूचक विधान जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी यावेळी केले. पक्षाचे लेटरहेड केवळ नावापुरते ठेवू नका. ज्यांना पक्ष संघटनेचे काम करायला वेळ नाही, त्यांची आता गय केली जाणार नसल्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील समानतेवर आधारित समाज निर्माण करणे म्हणजेच भारिपचे सोशल इंजिनिअरिंग आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदाधिकाºयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुरूवातीला पक्ष संघटनेत केला आणि त्यानंतर हाच प्रयोग करून नगर परिषद, ग्राम पंचायत निवडणुकीत यश मिळविले यावर यावेळी चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. निष्क्रिय कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवितानाच, निष्ठावान कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्यावर एकमत झाले. यापूर्वी काही जणांनी केवळ पदापुरता पक्षाचा वापर केला असून, हा प्रकार टाळण्यासाठी आता ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेण्याचा निर्णय झाला. बहुजनांच्या हितासाठी कार्य न करणाºयांना पक्षामधून पदमुक्त करू असे संकेत त्यानी दिले. ज्यांना केवळ पदाची ऊब घ्यायची आहे, त्यांना आता पदमुक्त करण्याची वेळ आली असून, नवे चेहरे पक्षात सक्रिय केले जाणार असल्याचे संकेत आहेत. पुंजानी यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समीक्षा बैठकीला नगरसेवक व पदाधिकाºयांची उपस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाने सध्या ‘आॅपरेशन क्लीन’ सुरू केले आहे. ‘नॉन परफॉर्मर’ पदाधिकाºयांचे लवकरच फेरबदल करून नवीन चेहºयांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी दिली.