कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी भाऊसाहेब लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:25+5:302021-04-20T04:42:25+5:30

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळण्यास डाॅ. साळुंकेंनी असमर्थता दर्शविल्याने डाॅ लहानेंची नियुक्ती झाली. कारंजा येथे मागील काही ...

Bhausaheb Lahane as Medical Superintendent of Karanja Sub-District Hospital | कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी भाऊसाहेब लहाने

कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी भाऊसाहेब लहाने

Next

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळण्यास डाॅ. साळुंकेंनी असमर्थता दर्शविल्याने डाॅ लहानेंची नियुक्ती झाली. कारंजा येथे मागील काही दिवसांपूर्वी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय माजी आमदार प्रकाश डहाकेंच्या प्रयत्नाने मिळालेल्या निधीतून निर्माण झाले; परंतु या रुग्णालयातील अंतर्गत राजकारणामुळे फार काळ कोणताही एक व्यक्ती वैद्यकीय अधीक्षक पदावर टिकून राहत नसल्याचे आतापर्यंतच्या अवलोकनावरून दिसून येते. अशातच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नथ्थुराम साळुंके यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळण्यास असमर्थता दर्शविल्याने डाॅ भाऊसाहेब लहाने यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. या संदर्भातील पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एम. के. राठोड यांनी दिले असून सोमवार, दि. १९ एप्रिल रोजी डाॅ. लहाने यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक पदावर असताना उपजिल्हा रुग्णालयाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु त्यानंतर अचानक त्यांची बदली कामरगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली हेाती.

Web Title: Bhausaheb Lahane as Medical Superintendent of Karanja Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.