भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:19 PM2018-01-02T15:19:14+5:302018-01-02T17:22:00+5:30

वाशिम - भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला.

Bhima Koregaon incident; A peaceful protest route Washim | भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

Next

वाशिम - भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही समाजकंटकांनी दगडफेक करीत भ्याड हल्ला केला. या घटनेचा निषेध म्हणून वाशिम शहरात आंबेडकरी अनुयायांसह सर्वच स्तरातील नागरिकांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढून भीमा कोरेगाव येथील घटनेतील दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. या घटनेचा निषेध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. संबंधित घटनेतील समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी, दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अन्यथा साखळी उपोषण, बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव जुमडे, दौलतराव हिवराळे, अमोल खडसे, रवी पट्टेबहादूर, कैलास तेलगोटे, विशाल सावंत, गजानन खरात, संतोष इंगळे, सुनील कांबळे, सुमित कांबळे, अजय ढवळे, गजानन भोयर, आर.एस. दारोकार, राहुल बलखंडे, एन.आर. भोजने, अजय भालेराव, संतोष टोलमारे, जी.बी. गायकवाड, मोहन गायकवाड, हरिदास बनसोड, गजानन खरात यांच्यासह शेकडो समाजबांधव, विविध स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कनेरगाव येथे एस.टी.बसच्या काचा फोडल्या!

कनेरगाव नाका (वाशिम): पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास अभिवादन करण्यादरम्यान उडालेला गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीचे पडसाद गतीने उमटत असल्याचे दिसून येत आहे. वाशिमपासून जवळच असलेल्या तथा हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे सोमवारी सायंकाळी एका बसची काच फोडल्यानंतर मंगळवारी पुन्हा सकाळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन, निदर्शने केली. यावेळी देखील तीन बसेस आणि एका खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.

Web Title: Bhima Koregaon incident; A peaceful protest route Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.