वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:47 PM2021-02-15T16:47:33+5:302021-02-15T16:47:42+5:30

MSEDCL NEWS भापुर येथिल सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रूपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे.

Bill of Rs. 3340 to the farmer even without electricity connection | वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक  

वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक  

googlenewsNext

भर जहॉगीर : वीजजोडणी नसतानाही एका शेतकºयाला महावितरणने ३३४० रुपयांचे देयक आकारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार भापूर येथे समोर आला आहे. याप्रकरणी गंभीर चूक करणाºया संबंधितांविरूद्ध महावितरण कोणती कारवाई करते, याकडे शेतकºयांसह अन्य ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
मागील अकरा महिन्यांपासुन कोरोना विषाणू संसर्गाने अनेकांचा रोजगार हिरावल. विजबिल माफी तर सोडाच; शेतातील विजेचा वापर न करता सुध्दा तालुक्यातील भापुर येथिल सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रूपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे. महावितरणकडून घरगुती विज बिलाची रक्कम अव्वाच्या सव्वा दिल्या जात असल्याने अनेकदा महावितरणच्या कार्यालयासमोर विजबिलाची होळी तर काहींनी आंदोनल केले. वीज देयक माफ होणार या चर्चेने परिसरातील अनेकांनी देयकाचा भरणा केला नाही. मागील तीन ते चार दिवसांपासून थकित देयक असणाºयांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली. दुसरीकडे वीजजोडणी नसतानाही भापूर येथील शेतकºयाला ३३४० रुपयांचे देयक आकारले आहे. ग्राहकांकडून काही चूक झाली किंवा देयकाचा भरणा करण्यास विलंब झाला तर दंडात्मक कारवाई करणारे महावितरण आता वीजजोडणी नसतानाही देयक आकारणी करणाºया अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कोणती कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

 
एका वर्षापूूर्वी शेतातील वीजजोडणीकरीता रितसर अर्ज केला आहे. परंतु अद्याप जोडणी मिळाली नाही. महावितरणकडून अचानक ३३४० रूपयांचे देयक आकारण्यात आले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि चूक करणाºयांविरूद्ध कारवाई व्हावी.
सदानंद प्रकाश बोडखे,
शेतकरी, भापूर
 
 
- ए.एस.दिवतडे
सहाय्यक अभियंता, महावितरण शाखा रिसोड

Web Title: Bill of Rs. 3340 to the farmer even without electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.