‘बायोमेट्रिक’ने होणार शेतकºयांची अर्ज नोंदणी!

By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:15 AM2017-07-26T02:15:02+5:302017-07-26T02:15:35+5:30

'Biometrics' will register the registration of farmers' appointees! | ‘बायोमेट्रिक’ने होणार शेतकºयांची अर्ज नोंदणी!

‘बायोमेट्रिक’ने होणार शेतकºयांची अर्ज नोंदणी!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यासाठी मागविल्या २५० मशीन पीक कर्जमाफीबाबत जिल्हा प्रशासनाची खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेंतर्गत शेतकºयांच्या अर्जाची योग्य पद्धतीने नोंद व्हावी यासाठी आधार क्रमांक घेण्यात येणार असून, एखाद्या शेतकºयाकडे आधार क्रमांक नसल्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच सेवा केंद्रांवर ‘बायोमेट्रिक’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकºयांना शासनाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होण्यास बराच विलंब लागला. या पृष्ठभूमीवर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाºयांसह, जिल्हा उपनिबंधक आणि बँकेच्या प्रतिनिधी अधिकाºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावून कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट निर्देश देताना काही आवश्यक सूचनाही केल्यात.
राज्य शासनाने २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार शेतकºयांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जमाफी मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांनी आॅनलाइन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करणे आवश्यक आहेत. त्यासाठी आधार क्रमांक सादर करावा लागणार आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयाने स्वत:च हा अर्ज सादर करावा म्हणून, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी असे अर्ज सादर केल्याने गोंधळ उडू नये म्हणून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आता ज्या शेतकºयांकडे अद्यापही आधार क्रमांक नाही आणि तो शेतकरी कर्जमाफीस पात्र असेल, तर अर्ज करण्यापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून ‘पॉस’ मशीन सेवा केंद्रावर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पूर्वीच १७० पॉस मशीन उपलब्ध असल्या तरी, जिल्ह्यातील सेवा केंद्रांची संख्या २७० आहे आणि ती अधिक वाढविण्याचा विचार जिल्हाधिकाºयांनी केला आहे. त्यामुळे अतिरिक्त २५० पॉस मशीनची मागणी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. बायोमेट्रिक पद्धतीवर आधारित प्रक्रियेनुसार कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करणाºया शेतकºयांच्या या मशीनवर अंगठ्याचा ठसा घेण्यात येणार आहे.

लिखित अर्जही करावे लागणार सादर!
४शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सूचना असल्या तरी, सदर अर्ज सादर करण्यासाठी जाताना आॅफलाइन अर्थात लिखित अर्जही भरून द्यावा लागणार आहे. असे अर्ज सर्वच संबंधित केंद्रांवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, या केंद्रांवरील संचालक शेतकºयांना सदर अर्ज भरून देण्यास सहकार्य करणार आहेत. त्या संदर्भातील सर्व सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक अधिकाºयांमार्फत सर्वच आॅनलाइन सेवा केंद्रधारकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना आपले अर्ज अचूक पद्धतीने सादर करता येणार आहेत.

कर्जमाफीस पात्र असलेल्या जिल्ह्यातील ज्या शेतकºयांकडे आधारक्र मांक नाहीत, अशा शेतकºयांनाही अर्ज सादर करता यावेत म्हणून महाआॅनलाइन, ई-सेवा केंद्रांवर पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत. याची फारशी गरज पडणार नसली तरी, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आधीच १७० पॉस मशीन उपलब्ध असल्या तरी, अतिरिक्त सेवा केंद्रे सुरू करायची असल्याने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे २५० पॉस मशीनची मागणी नोंदविण्यात आली आहे. .
- राहुल द्विवेदी
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: 'Biometrics' will register the registration of farmers' appointees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.