मंगरुळपीर येथील वन्यजीवरक्षकांचे ‘पक्षी बचाओ’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:23 PM2018-05-10T14:23:20+5:302018-05-10T14:23:20+5:30

वाशिम: मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने पक्षी बचाओ अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे.

'Bird Bachao' campaign of Wildlife Guard in Mangrulpir | मंगरुळपीर येथील वन्यजीवरक्षकांचे ‘पक्षी बचाओ’ अभियान

मंगरुळपीर येथील वन्यजीवरक्षकांचे ‘पक्षी बचाओ’ अभियान

Next
ठळक मुद्देमंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहे. आजवर या संघटनेने मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात मिळून ४ हजार जलपात्र वितरित करण्यात आले. पृष्ठाच्या निकामी खोक्यांचे संकलन करून ही मंडळी पक्ष्यांसाठी जलपात्र, बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटी तयार करीत आहेत.

वाशिम: मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने पक्षी बचाओ अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे.  या संघटनेच्या वनोजा येथील शाखेने या अभियानांतर्गत वनोजा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे, जलपात्र आणि ‘बर्ड फिडर’ अर्थात दाणेपात्रांचे वितरण केले. 
मागील काही वर्षांपासून होत असलेल्या वारेमाप जंगलतोडीमुळे वन्यप्राणी, पक्ष्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेच शिवाय या संघटनेकडून पक्षी बचाओ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत त्यांच्यावतीने ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेच शिवाय पक्ष्यांसाठी जलपात्र, दाणेपात्र आणि कृत्रिम घरट्यांचे वितरण त्यांच्याकडून करण्यात आहे. आजवर या संघटनेने मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात मिळून ४ हजार जलपात्र वितरित करण्यात आले असून, या संघटनेच्या वनोजा शाखेकडून मानद वन्यजीवरक्षक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वनोजा येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात पक्ष्यांसाठी जलपात्र, बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटे वितरण करण्यात आले. पशुवैद्यकिय अधिकारी गोडघासे यांच्याकडे जलपात्र, बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटे देण्यात आले. यासाठी आदित्य इंगोले, सौरव इंगोले व वैभव गावंडे यांनी परिश्रम घेतले. 
 
साहित्य निर्मितीसाठी टाकाऊ वस्तूंचा वापर 
वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम वन्यजीवांसाठी स्वखर्च आणि लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित असून, पक्षी बचाओ अभियानासाठी जलपात्रांसह बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटे तयार करण्यासाठी ते टाकाऊ घरगुती वस्तूंचा वापर करीत आहेत. पाण्याच्या बाटल्या, निकामी झालेल्या कॅन, तसेच पृष्ठाच्या निकामी खोक्यांचे संकलन करून ही मंडळी पक्ष्यांसाठी जलपात्र, बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटी तयार करीत आहेत.

Web Title: 'Bird Bachao' campaign of Wildlife Guard in Mangrulpir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.