वाशिममध्ये उद्या पक्षी गणना कार्यशाळा!

By admin | Published: March 10, 2017 02:03 AM2017-03-10T02:03:03+5:302017-03-10T02:03:03+5:30

सहज आढळणार्‍या पक्ष्यांच्या निरीक्षण पद्धतींवर होणार ऊहापोह.

Bird calculation workshop in Washim tomorrow! | वाशिममध्ये उद्या पक्षी गणना कार्यशाळा!

वाशिममध्ये उद्या पक्षी गणना कार्यशाळा!

Next

मालेगाव (जि. वाशिम),दि. ९- येथे येत्या शनिवार, ११ मार्च रोजी वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पक्षी गणना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेषत: सहज आढळणार्‍या पक्षी निरीक्षण अभ्यासासंदर्भातील वैज्ञानिक पद्धतींवर ऊहापोह होणार असल्याची माहिती पक्षिमित्र शिवाजी बळी यांनी दिली.
निसर्गात पक्ष्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. तथापि, स्थानिक पक्षी वैभवाचे संवर्धन प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने ह्यबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीह्ण ने ह्यकॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रामह्णची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या लोकांना पक्षी अभ्यासाच्या वैज्ञानिक पद्धती शिकविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने नोंदी कशा घ्याव्यात व सामान्य पक्षी कसे व का अभ्यासावे, याबाबात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जे पक्षी सर्वसामान्यपणे आपल्या परिसरात आढळतात व ज्यांना ओळखायला त्रास होत नाही, अशा पक्ष्यांची सामान्य पक्षी म्हणून गणना होते. यात चिमणी, कावळा, पोपट, घार, कोतवाल, मैना, बुलबुल, होला, कोकिळा, शिक्रा, तांबट, आदी पक्ष्यांचा समावेश होतो. यासंबंधीची सविस्तर माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे.
या पक्षीगणना कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधन सहायक नंदकिशोर दुधे लाभणार आहेत. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील पक्षीमित्र व निसर्गप्रेमीन्ंी लाभ घ्यावा, असे आवाहन वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे सचिव शिवाजी बळी यांनी केले आहे.

Web Title: Bird calculation workshop in Washim tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.