वाशिम जिल्ह्याती सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 03:55 PM2021-02-27T15:55:48+5:302021-02-27T15:56:03+5:30
Bird Flu : बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे.
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे.
सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाधित कोंबड्या आढळलेल्या सोनखास येथील खासगी कुक्कुट फार्म व परिसरातील कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शनिवारी दिला. सोनखास येथील बाधित कोंबड्या आढळलेल्या कुक्कुट फार्म या बाधित क्षेत्रापासून १ किलोमीटर परिसरातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी काही पक्षी मृत्युमुखी आढळून आल्यास नजीकच्या पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले.