ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर!

By Admin | Published: July 17, 2017 02:36 AM2017-07-17T02:36:09+5:302017-07-17T02:36:09+5:30

महाप्रसादाचे वितरण : शिरपूर येथे ५१ भजनी दिंड्यांच्या गजरात निघाली शोभायात्रा

On the birth of Omkargir Baba's death anniversary! | ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर!

ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील समर्थ जानगीर महाराज संस्थानवर सुरू असलेल्या ओंकारगिर बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळयाचा रविवारी भक्तीमय वातावरणात समारोप करण्यात आला. यानिमित्त ओंकारगिर बाबांच्या पालखीची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला
दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान मध्ये संत ओंकारगिर बाबा यांची पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. ९ जुलै पासून सुरु झालेल्या ओंकारगिर बाबा पुण्यतिथी सोहळयानिमित्त संस्थानमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवार १६ जुलै हा सोहळयाचा मुख्यदिवस असल्याने सकाळी ५ वाजता ओंकारगिरबाबा यांच्या प्रतिमा रथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
‘जानगीर महाराज की जय, ‘ओंकारगिर बाबा की जय’ असा जयघोष करीत ही शोभायात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली. दरम्यान, मिर्झा मियॉ दर्गाह, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, सावता माळी युवक मंडळ, इरतकर वेटाळाकडून भाविकासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. गावातील बसस्थानक परिसर, जैन मंदिर परिसरातून पालखी दुपारी संस्थानवर पोहचल्यानंतर दुपारी ३ वाजतापासून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून पुण्यतिथी सोहळयाची सांगता करण्यात आली. टाळमृदंगाचा नाद आणि समर्थ जानगीर महाराज, तसेच ओंकारगिर बाबांच्या जयघोषात हजारो भाविक तल्लीन झाले होते. त्यामुळे संपूर्ण गावाता भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

मिर्झा मिया दरगाहमध्ये शोभायात्रेचे स्वागत
ओंकारगिरबाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा परंपरेनुसार मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहवर नेण्यात आली. या ठिकाणी मिर्झा मियॉ बाबा दर्गाहच्या विश्वस्तांनी ओकांरगिर महारारांच्या पालखीचे स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अद्यापही अबाधित असून, यामुळे गावातील धार्मिक सलोख्याची प्रचिती येते. दरम्यान, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरावरही या शोभायात्रेचे मनोभावे स्वागत करण्यात आले.

९० क्विंटलचा महाप्रसाद!
ओंकारगिर बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या समारोपानिमित्त महाप्रसादासाठी ११ क्विंटलची बुंदी, ५१ क्विंटल गव्हाच पोळ्या व ३१ क्विंटल काशीफळाची भाजी बनविण्यात आली होती. हा प्रसाद बनविण्यासाठी गावकरी, युवकांसह संत ओंकारगिर संस्थानच्या विश्वस्तांनी परीश्रम घेतले. बुंंदीची ५० हजार पाकिटे तयार करण्यासाठी गावकरी, युवक, तसेच संत आेंकारगिर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात ६० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: On the birth of Omkargir Baba's death anniversary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.