जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:46 PM2017-09-15T19:46:42+5:302017-09-15T19:46:53+5:30

वाशिम - वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा निकाल १५ सप्टेंबर रोजी घोषित झाला असून, भाजपाच्या करूणा कल्ले विजयी झाल्या तर राकाँच्या संघमित्रा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

The BJP candidate won the District Planning Committee elections | जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी

Next
ठळक मुद्देवाशिम जिल्हा नियोजन समिती निवडणूकभाजपाच्या करूणा कल्ले विजयी 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा निकाल १५ सप्टेंबर रोजी घोषित झाला असून, भाजपाच्या करूणा कल्ले विजयी झाल्या तर राकाँच्या संघमित्रा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 
लहान नागरी क्षेत्रातील रिक्त तीन जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक घेण्यात आली. यापूर्वी दोन जागा अविरोध झाल्याने १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी मतदान घेण्यात आले. एकूण ९८ मतांपैकी ९४ मते वैध ठरली. पहिल्या फेरीत उमेदवाराला निवडून येण्यासाठी ४८ मतांचा कोटा आवश्यक होता. करूणा कल्ले यांना पहिल्या फेरीतच ५८ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. संघमित्रा पाटील यांना ३६ मते मिळाली. 

Web Title: The BJP candidate won the District Planning Committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.