पालकमंत्र्यांविरोधात भाजपा, शेतकरी संघटनेचे आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:34+5:302021-04-23T04:43:34+5:30

वाशिम : कोरोनाकाळातही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात आले नसल्याचा आरोप करीत पालकमंत्री हरविले असून, कुणाला सापडल्यास बक्षीस देण्यात येईल, अशा ...

BJP, farmers' union agitation against Guardian Minister! | पालकमंत्र्यांविरोधात भाजपा, शेतकरी संघटनेचे आंदोलन !

पालकमंत्र्यांविरोधात भाजपा, शेतकरी संघटनेचे आंदोलन !

googlenewsNext

वाशिम : कोरोनाकाळातही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात आले नसल्याचा आरोप करीत पालकमंत्री हरविले असून, कुणाला सापडल्यास बक्षीस देण्यात येईल, अशा आशयाचा फलक घेऊन भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री हरविल्यासंदर्भात थेट वाशिम शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

जिल्ह्यात दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमानाने जिल्हावासी पुरते भयभीत झालेले आहेत. अपुऱ्या सुविधा, बेड, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनच्या टंचाईने यात आणखीच भर घातली आहे. नागरिक विविध समस्यात असताना पालकमंत्री मात्र गत तीन महिन्यांपासून जिल्ह्यात फिरकले नाहीत, असा आरोप करीत भाजपा व शेतकरी स्वाभिमानी संघटनेने गुरूवारी ‘आपण पालकमंत्र्यांना पाहिलतं का?’ असे अनोखे आंदोलन करून पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविला. सक्रिय रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीयच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही खाटांची संख्या तोकडी पडत आहे. प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई आहे. जीवन - मरणाच्या या अदृश्य लढाईत जिल्ह्याचे पालक नेमके कुठे हरविले आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपा व शेतकरी संघटनेने पालकमंत्र्यांविरोधात अनोखे आंदोलन छेडले. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी, स्वाभिमानी शेतकरी संंघटनेचे विभागीय प्रमुख दामोघर इंगोले आदींची उपस्थिती होती.

Web Title: BJP, farmers' union agitation against Guardian Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.