भाजपा सरकारने शेतक-यांना भिकारी करून टाकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 07:01 PM2017-09-24T19:01:56+5:302017-09-24T19:04:46+5:30
वाशिम - शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध आघाडींवर भाजपा सरकार अपयशी ठरले असून, दारोदारी शेतकºयांना फिरावे लागत आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: भिकारी करून टाकले, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस नेते व पदाधिकाºयांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध आघाडींवर भाजपा सरकार अपयशी ठरले असून, दारोदारी शेतक-यांना फिरावे लागत आहे. भाजपा सरकारने शेतक-यांना अक्षरश: भिकारी करून टाकले, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस नेते व पदाधिका-यांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकाळात शेतक-यांसाठी ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली. शेतकºयांकडून कोणताही अर्ज भरून न घेता कर्जमाफीचा लाभ दिला. भाजपा सरकारने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शेतक-यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले. ८९ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत, असे सरकारने सांगितले होते. आता कर्जमाफीसाठी ५८ लाख शेतक-यांचे अर्ज झाल्याने उर्वरीत शेतकरी गेले कुठे, ८९ लाखाचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला. ८९ लाख शेतक-यांसाठी ३४ हजार कोटींची तरतूद केल्याचे सरकार सांगत आहे. ३४ हजार कोटींची तयारी केली असेल तर दीड लाख रुपयांऐवजी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. भाजपा सरकारने बळीराजांचा घोर अपमान चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नारायण राणेंनी आत्मपरिक्षण करावे !
नारायण राणेंसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, नारायण राणे हे ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यांनी स्थिर राहून काम केले पाहिजे. राणे यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.