तृणमूलच्या हिंसाचाराचा भाजपाने नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:19+5:302021-05-06T04:43:19+5:30
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे, असा ...
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे, असा आरोप भाजपाने यावेळी केला. या पक्षाचे कार्यकर्ते हे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत. कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार राजरोसपणे घडत आहेत. लोकशाहीच्या होणाऱ्या या हत्येच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ५ मे रोजी जिल्हाभरात शांततामय निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील तब्बल ५६० बूथवर कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील राजे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील काळे, श्याम बढे यांच्या मार्गदर्शनात तर वाशिम तालुक्यात तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, मंगरूळ्पीर तालुक्यात तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे, शहराध्यक्ष श्याम खोडे, कारंजा तालुक्यात तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, शहराध्यक्ष ललित चांडक, मानोरा तालुक्यात तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, मालेगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष सुरेश मुंढे, शहराध्यक्ष संतोष तिखे तर रिसोडमध्ये जिल्हा उपाध्यक्ष खुशाल ढोणे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली.