भाजपा-सेना कार्यकर्ते रस्त्यावर; शहराला पाेलीस छावणीचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:33+5:302021-08-21T04:46:33+5:30
नंदकिशाेर नारे वाशिम : भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी खा. भावना गवळी यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत जे प्रकरण ...
नंदकिशाेर नारे
वाशिम : भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी खा. भावना गवळी यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत जे प्रकरण चाैकशीत आहे, या प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये माेठया प्रमाणात राेष हाेता. किरीट साेमय्या जिल्हा दाैऱ्यावर असल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता पाहता शहरात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवल्याने शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले हाेते. यावेळी दाेन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले.
भाजपाचे नेते किरीट साेमय्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार हाेते. तत्पूर्वी त्यांनी देगाव येथील पार्टीकल बाेर्डची पाहणी व बंद असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले. परंतु तेथे जाताच त्यांच्या वाहनावर दगडफेक व
शाई फेक झाल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. त्यानंतर वाशिम येथे असलेल्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सर्वत्र तसेच शहरातील विविध भागात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
पत्रकार परिषद सुरू हाेण्यापूर्वी काही शिवसैनिक भाजपा कार्यालयाकडे येत असतांना मध्येच पाेलिसांनी त्यांना राेखले व अटक केली. आज शहरात सर्वत्र असलेला पाेलीस बंदाेबस्त चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले.
.................
दाेन्ही पक्षांच्या कार्यालयासमाेर तगडा बंदाेबस्त
जिल्ह्यात भाजपा नेते किरीट साेमय्या येणार असून, यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेल्या मताने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपा व शिवसेना दाेन्ही पक्ष कार्यालयांच्या ठिकाणी कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता. भाजपा कार्यालय असलेल्या पाटणी कमर्शियलमध्ये प्रवेश करणारे काही प्रवेशव्दार बंद ठेवून पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. जिल्ह्यात कडक पाेलीस बंदाेबस्त असतानाही देगाव येथे अनुचित प्रकार घडून आला.