सर्व पक्ष एकत्रित आल्याने भाजपचा पराभव - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 PM2020-12-05T17:04:03+5:302020-12-05T17:08:06+5:30

Devendra Fadnavis हा पराभव भाजपसाठी भविष्यातील सुवर्णसंधी आहे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडले.

BJP's Defeat as all parties come together - Devendra Fadnavis | सर्व पक्ष एकत्रित आल्याने भाजपचा पराभव - देवेंद्र फडणवीस

सर्व पक्ष एकत्रित आल्याने भाजपचा पराभव - देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  निवासस्थानी थांबले होते.जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.


वाशिम : राज्यात झालेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. नेहमीप्रमाणे भाजपाला  निवडणुकीत मिळणारी टक्केवारी याहीवेळी कायम होती, मात्र सर्व पक्ष एकत्रित आल्यामुळेच राज्यात भाजपाचा पराभव झाला.  तरी भविष्यात भाजप कार्यकर्त्यांसमोर हे खूप मोठे आव्हान आहे. भविष्यात भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सत्ता येण्यासाठी आताचा पराभव हा भाजपसाठी भविष्यातील सुवर्णसंधी आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वाशिम येथे भाजपा पदाधिकारी व  कार्यकर्तासमोर मांडले. शनिवार ५ डिसेंबर रोजी  सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाशिम मार्गे हिंगोलीकडे जात असताना काही वेळेसाठी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  निवासस्थानी थांबले होते.याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी,आमदार रणधीर सावरकर, आमदार रवी राणा, भाजयुमाे प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुके देऊन स्वागत केले.

Web Title: BJP's Defeat as all parties come together - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.