काळी फ़ीत निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:45+5:302021-04-20T04:42:45+5:30
१९ ते २३ एप्रिल २०२१ या कालावधीत ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात किंवा वर्क फ्राॅम होम असेल तर ...
१९ ते २३ एप्रिल २०२१ या कालावधीत ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात किंवा वर्क फ्राॅम होम असेल तर घरी राहून काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू आहे.
भारत सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले तसेच तीन किसान विरोधी कायदे लागू केले , बहुजनांचा पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले, कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन योजना लागू केली,
सार्वजनिक उद्योग, कंपनी यांचे खाजगीकरण केले, नवीन शैक्षणिक धोरण राबविणे सुरू केले या सर्वाचा निषेध म्हणून व त्या विरोधात हे आंदोलन आहे. पंचाळा येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम सोळंके, बी. के. मनवर, गोपाल डाखोरे यांनी काळी फीत लावून निषेध नोंदविला आहे. सर्व कर्मचारी यांनी संविधानिक मार्गाने, कोविडचे सर्व नियम पाळून आंदोलनात सहभागी व्ह्यावे, असे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्रोटान शाखा मानोराच्यावतीने करण्यात आले आहे.