वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:21+5:302021-07-23T04:25:21+5:30
तालुक्यातील खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे ...
तालुक्यातील खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन फक्त वेळ काढून नेण्याची भूमिका घेतात असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रिसोड-मेहकर रस्त्यावरील वाकद येथे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ काम सुरू करण्याचे कबूल करून घेतले. गोहगाव ते वाकद या गावांना जोडणारा आलेला पूल २१ जुलैला वाहून गेला तर रिसोड शहराची अवस्था फार वाईट आहे. रास्ता रोकोनंतर ही प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी दिला. कामचुकार अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू दिल्या जाणार नसल्याचे संकेत तालुका अध्यक्ष अकिल देशमुख यांनी दिले.
००००
आंदोलनात यांची उपस्थिती
तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाकद येथील रास्ता रोको आंदोलनात जिल्हा महिला अध्यक्षा प्रमिला शेवाळे, रवींद्र मोरे पाटील, प्रा रंगनाथ धांडे, उत्तम झगडे, केशवराव सभादिंडे, विश्वनाथ पारडे, प्रदीप खंडारे, अनिल गरकळ, प्रा. रवि अंभोरे, अर्जुन डोंगरदिवे, मंदाताई धांडे, साहेबराव नवघरे, विजय सिरसाट, मनोज देशमुख, जहुर खान, गोपाल खडसे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.