परांडे जांभरूननजीक पुलावर शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:58+5:302021-06-24T04:27:58+5:30
पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस जया खराटे यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, कंत्राटदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, मृतक ...
पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस जया खराटे यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, कंत्राटदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, मृतक महिलेच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिवसेना तालुका प्रमुख महादेव ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे यांनी याप्रसंगी कंत्राटदार कंपनीच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला. याप्रसंगी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यास आंदोलनस्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन मी नुकताच याठिकाणी रूजू झाल्याचे सांगून हात झटकले. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नायब तहसीलदार पुरोहित, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार झळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, उपजिल्हा प्रमुख महादेव सावके, रवी भांदुर्गे, रामदास मते पाटील, उद्धव गोडे, गजानन भांदुर्गे, गजानन ठेंगडे, देवा राऊत, प्रदीप मोरे, विजू खानझोडे, बालू माल, गजानन जैताडे, विलास जाधव, पं. स. सदस्य गणेश साबळे, गणेश बोरकर, चंदू जाधव, संतोष बळी, आशिष डहाळे, पवन इरतकर, बालाजी वानखडे, गजानन भुरभुरे, अमृता गोरे, अशोक शिराळ, गणेश पवार, बंडू शिंदे, चंदू खेलुरकर, केशवराव डुबे, बाळासाहेब देशमुख, सतीश खंडारे, कुरेशी, पांडुरंग पांढरे, राजू धोंगडे, गोपाल लव्हाळे, रामदास काकडे, गणेश इंगोले, वसुदेव भुसारी, प्रकाश महाले, नंदू भोयर, किशोर देशमुख, आकाश कांबळे, नारायण ठेंगडे, देवानंद बरडे, संदीप गंगावणे, रामकिसन वानखडे, रवी वानखडे, केशव महले, अमोल मापारी उपस्थित होते.