पाच वर्षांत रक्त संकलनात आठपटीने वाढ !

By admin | Published: October 1, 2015 01:04 AM2015-10-01T01:04:24+5:302015-10-01T01:04:24+5:30

वाशिम जिल्ह्यात रक्तदान शिबिरांची संख्या वाढली.

Blood collection in 8 years in 8 years | पाच वर्षांत रक्त संकलनात आठपटीने वाढ !

पाच वर्षांत रक्त संकलनात आठपटीने वाढ !

Next

संतोष वानखडे / वाशिम : रक्ताची नाती जोडण्यासाठी दात्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत असून, जिल्ह्यात गत पाच वर्षांत आठपटीने रक्तदानात वाढ झाली आहे. २0१0 मध्ये रक्त संकलनाचे ३00 पिशव्यांचे प्रमाण २0१५ साली १४२५ वर गेले आहे. रक्त म्हणजे जीवन. वेळेत रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्यापक जनजागृती केली जाते. जिल्ह्यात रक्तपेढीतील ऐच्छिक रक्त संकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत शासकीय रक्तपेढीत २0१0 मध्ये ३00 बाटल्या, २0११ मध्ये ६३१, २0१२ मध्ये १२६५, २0१३ मध्ये १0८0 आणि २0१४ मध्ये २१३७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. २0१0 मध्ये २४३ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला. २0११ मध्ये ५५८, २0१२ मध्ये १११८, २0१३ मध्ये ९३५ आणि २0१४ मध्ये २0३७ पिशव्या रक्ताचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दप्तरी आहे. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या आठ महिन्यात १४२५ पिशव्या रक्त संकलन झाले असून, १२२५ पिशव्या पुरवण्यात आला आहे.

Web Title: Blood collection in 8 years in 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.