शिवजयंतीनिमित्त शिरपूर येथे १५५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:36+5:302021-02-23T05:01:36+5:30
दरवर्षी शिरपूर येथील सर्वधर्मीय शिवप्रेमींकडून शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात ...
दरवर्षी शिरपूर येथील सर्वधर्मीय शिवप्रेमींकडून शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या स्वरूपाचे रक्तदान शिबीर २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिरपूर आरोग्य केंद्रातील परिचारिका मालू झाडे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमिला कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान करण्यासाठी तरूण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या शिबिरात हिंदू, मुस्लिम बांधवांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला. रक्तदान शिबिरामध्ये एकूण १५५ महिला, पुरुषांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश अहिर , पंचायत समिती सदस्य शकीलखा पठाण अमृतराव देशमुख, अशोकराव देशमुख, सलीम गवळी,पंकज देशमुख, उपसरपंच असलम परसूवाले, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख,पप्पू देशमुख, रामा मानवतकर यांनी भेट दिली शिबिराच्या यशस्वीतेसाठी संदीप देशमुख, किशोर देशमुख, अमोल देशमुख, अमर देशमुख, विलास देशमुख, देविदास जाधव, सुखदेव देशमुख, बाळू देशमुख, अतिश जाधव, विनायक देशमुख, विशाल परिहार,किशोर जाधव,राम देशमुख,आकाश देशमुख,प्रतिक देशमुख, शाम वाघ, ज्ञानेश्वर देशमुख, धनंजय देशमुख, वैभव देशमुख, माधवराव देशमुख,भैया देशमुख, भागवत जाधव यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी अकोला येथील स्त्री रुग्णालय ची टीम व वाशिम येथील शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय चा टिमला पाचारण करण्यात आले होते. अकोल्याच्या चमूने ८४ बोटल रक्त संकलन केले तर वाशीम चा चमूने ७१ बोटल रक्त संकलन केले.