कवठा येथील शिबिरात ५३ जणांचे रक्तदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:12+5:302021-07-17T04:31:12+5:30
जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुल देशमुख यांनी फीत कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष ...
जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुल देशमुख यांनी फीत कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष गजाननराव लाटे, माजी जि. प. सदस्य स्वप्निल सरनाईक, माजी पं. स. सभापती बबनराव हरिमकर, चेअरमन संतोष लाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठा जि. प. गटातील ५३ युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. स्वप्निल सरनाईक यांनी स्वतः रक्तदान करून युवकांचा उत्साह वाढविला. शिबिराच्या यशस्वितेसाठी कवठा सरपंच भिकाजी सावसुंदर, उपसरपंच युवराज सरनाईक, संदीप हरिमकर, नंदकिशोर शर्मा, विठ्ठल देशमुख, मंगेश भोयाळकर, धीरज अग्रवाल, संदीप सरनाईक, शुभम भोयाळकर आदींनी परिश्रम घेतले.
............
मान्यवरांनी दिल्या भेटी !
चिखली सरपंचपती रमेश अंभोरे, ग्रा.पं. सदस्यपती बाबूराव वानखडे, व्याड सरपंच मनोज थोरात, उपसरपंच रामा बोरकर, देऊळगाव-पेडगाव सरपंच दिनेश सुरटकर, उपसरपंच काशिनाथ अंभोरे, पंजाबराव अवचार (किनखेडा) आदींनी रक्तदान शिबिराला भेट दिली.