कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून ११ जुलैला रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:41+5:302021-07-09T04:26:41+5:30
वाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ ...
वाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलै दरम्यान ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत ११ जुलै रोजी मंत्री पार्क येथील बांडे कोचिंग क्लासेस येथे सकाळी ११ वाजेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन ‘कोचिंग क्लासेस’ संघटनेकडून करण्यात आले आहे.
लोकमतच्या वतीने गेल्या आठवडाभरापासुन जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोबत जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे गंभीर व दुर्मिळ आजार जडलेल्या रुग्णांना तसेच प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्यास, अपघांतामध्ये गंभीर जखमी झाल्यास संबंधितांनाही रक्ताची गरज भासते. ही गरज बघता ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या या उपक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस असोसिएशननी स्वत: पुढाकार घेऊन या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदाते मिळविण्याचा संकल्प हाती घेतला असल्याचे माहिती कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. पंकजकुमार बांडे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रा. गोपाल वांडे, वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रा. अतुलकुमार वाळले, वाशिम तालुका अध्यक्ष प्रा. दिलीप महाले यांनी दिली.
रविवार ११ जुलै रोजी मंत्री पार्क परिसरातील बांडे कोचिंग क्लासेसमध्ये सकाळी ११ वाजेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रा. पंकज बांडे यांनी केले आहे.
कोट घेणे
आजघडीला रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे.
प्रा. पंकजकुमार बांडे
राज्य उपाध्यक्ष कोचिंग क्लासेस असोसिएशन
कोट घेणे
‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. आम्ही कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने ११ जुलैला शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान करावे.
प्रा. गोपाल वांडे
पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष
कोट घेणे
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे अपेक्षित आहे. रक्तदानासाठी लोकमतने घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा.
प्रा. अतुल वाळले
वाशिम जिल्हा अध्यक्ष
कोट घेणे
‘लोकमतने’ रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सध्या जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, याकरिता सर्वांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा.
प्रा. दिलीप महाले
वाशिम तालुका अध्यक्ष