१०१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 04:49 PM2019-08-16T16:49:31+5:302019-08-16T16:49:38+5:30
जुने जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित शिबिरात १०१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून पोलीस विभागातर्फे १६ आॅगस्ट रोजी जुने जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित शिबिरात १०१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून सामूहिक रक्तदान शिबिर घेण्यात आले असून, जमा झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. शिबिराची सुरुवात जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या रक्तदानाने झाली. १०१ पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान केले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बनसोड, पोलीस उपअधीक्षक (गृह) केडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सुद्धा रक्तदान केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बनसोड, पोलीस उपअधीक्षक (गृह) केडगे, आर्थिक गुन्हे शाखेच्या मुर्दूला लाड, स्थानिक जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, शहर पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कावरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वितेसाठी पोलीस कर्मचारी व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.