जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांनी केले रक्तदान आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:58 PM2019-01-28T14:58:09+5:302019-01-28T14:58:46+5:30
वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले. यावेळी जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह निवडश्रेणीचा जाचक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी ‘एल्गार’ पुकारला असून प्रजासत्ताकदिनाच्या औचित्यावर रक्तदान आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार वसंतराव खोटरे व प्रांताध्यक्ष विकास सावरकर संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरणराव सरनाईक, विज्युक्टाचे प्रा. अनिल काळे, प्रा. प्रशांत कव्हर, प्राचार्य मंगेश धानोरकर, अनंत सुपनर, विनायक उज्जैनकर, सै. अयुब, हित्वा बेनिवाले यांच्यासह असंख्य शिक्षकांनी सहभाग नोंदविला.