जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक करणार रक्तदान आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:08 PM2019-01-22T16:08:45+5:302019-01-22T16:09:13+5:30
वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह निवडश्रेणीचा जाचक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी ‘एल्गार’ पुकारला असून प्रजासत्ताकदिनी वाशिम येथे रक्तदान आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात माजी आमदार वसंतराव खोटरे व प्रांताध्यक्ष विकास सावरकर सहभागी होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी मुख्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी होवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.