नाल्यात वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:58 PM2017-09-21T19:58:44+5:302017-09-21T19:58:54+5:30
वाशिम : तालुक्यातील काजळंबा येथील सुमन सुभाष इंगोले (वय ४०) ही महिला गुरे चारून घरी परत येत असताना नाल्यामध्ये पाय घसरून पडली. नाल्याला पुर आल्यामुळे तिचा पाण्यात डुबून मृत्यू झाला. तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा धरणात मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील सुमन इंगोले ही महिला नेहमीप्रमाणे म्हशी राखण्यासाठी शेतामध्ये गेली होती. सायंकाळी घरी परत येत असताना वाटेतच असलेला नाला ओलांडतांना तिचा तोल गेल्याने ती नाल्यात पडली. पाऊस आल्यामुळे नाला पाण्याने भरून वाहत होता. सुमन इंगोले ही घरी न पोहचल्यामुळे तिचा कुटूंबीयांनी व गावातील मंडळींनी रात्रभर परिसरात शोध घेतला. परंतू रात्री तीचा शोध लागू शकला नाही. अखेर गुरूवारला तिचा मृतदेह मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील धरणात आढळून आल्याची माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली.