मानोरा तालुक्यातील धानोरा येथे बोगस बीटी बियाने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 08:19 PM2021-05-31T20:19:09+5:302021-05-31T20:19:20+5:30
Bogus Bt Cotton seeds siezed कृषि विभागाच्या चमूने १ मे रोजी धाड टाकली असता, ५ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Next
आ ोपी फरार : गुन्हे दाखल मानोरा : मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धानोरा (घाडगे) येथे कपाशीच्या बोगस बी. टी. बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कृषि विभागाच्या चमूने १ मे रोजी धाड टाकली असता, ५ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संदीप दादाराव थेर यांचे विरिद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पंचायत समितिचे कृषि अधिकारी डी. एस. मकासरे यांच्या फ़िर्यादीनुसार, धानोरा बु.(घाडगे) येथे बोगस बी टी बियाने असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन घराची जड़ती घेतली असता एकूण १० कट्टे आढळून आले. त्यापैकी ९ कट्टे सीलबंद व एक कट्टा खुला आढळून आला. त्यामध्ये ४९२ कापूस बियाने पाकिटे असून, कल्याण १११ संशोधित असा उल्लेख आढळून आला. सदर एका पाकिटावर मूल्य १२०० रुपये तर त्याचे वजन ४५० ग्राम आढळून आले. एकूण ४९२ पाकिटे जप्त केली असून, याची किमंत ५ लाख ९० हजार ४०० रूपयाच्या घरात जाते. सदर बोगस बियाण्याची पाकिटे नंदूरबार येथून आरोपिने आणल्याचे फिर्यादित नमूद आहे. पोलिस स्टेशनला बोगस बियाणे ठेवून देण्यात आले. धाडसत्रादरम्यान आरोपी संदीप थेर फरार झाला असून त्याचे विरुद्ध विनापरवाना बियाने साठवने व विक्री करने तसेच ४२० सह विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई पंचायत समितिचीचे कृषि अधिकारी डीगांबर मकासरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के, थानेदार शिशिर मानकर यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार मदन पुनेवार,महादेव पायघन,पार्वती लड़के,पोलिस पाटिल अमोल हागे यांनी केली.