राज्यातील २१ जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 10:43 AM2020-11-08T10:43:13+5:302020-11-08T10:46:37+5:30

Pink bolworm on cotton washim Newsकृषी आयुक्तालयाने राज्यातील २१ जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रणासाठी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Bondali control campaign in 21 districts of the state | राज्यातील २१ जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिम

राज्यातील २१ जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिम

googlenewsNext
ठळक मुद्देकपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. २१ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यात यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालयाने राज्यातील २१ जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रणासाठी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या असून, याबाबत ६ नोव्हेंबर रोजी संबंधित जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या उपाय योजनानंतरही यंदा राज्यात बोंडअळीचा प्रकोप दिसत आहे. त्यात नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बिड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या २१ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असून, या अळीमुळे नुकसानाची पातळी ओलांडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहिम राबविण्याच्या सुचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. या संदर्भात उपरोक्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांना ६ नोव्हेंबर रोजी आयुक्तालयाकडून पत्रही पाठविण्यात आले आहे.
 
फरदडमुक्तीसाठी विशेष प्रयत्न
यंदा परतीच्या पावसामुळे कापसाची वेचणी लांबली असून, अनेक शेतकºयांच्या शेतात अद्यापही मोठ्या प्रमाणात कापूस आहे. हे शेतकरी दीर्घकाळ शेतात कापूस ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोंडअळीला पुरेसा खाद्य पुरवठा होऊन पुढील हंगामातही प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांना फरदडीचा कापूस घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
जिनिंग, प्रेसिंगमध्ये कामगंध सापळे अनिवार्य
बोंडअळीचा प्रादूर्भाव झालेली कपाशी जिनिंग, प्रेसिंगमध्ये आल्यानंतर तिला पुरेसा अन्नपुरवठा दीर्घकाळ उपलब्ध होऊन तिचा जीवनक्रम लांबतो. त्यामुळे जिनिंग, प्रेसिंग किंवा कापूस प्रक्रिया उद्योग संचालकांच्या बैठकीचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन करण्यासह बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावण्याबाबत सुचनाही देण्यात येणार आहेत.
 
बाजार समित्या, जिनिंगकडून शेतकºयांना कामगंध सापळे
बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिनिंग, पे्रसिंग परिसरात कामगंध सापळे लावण्यासह या संस्थांच्या परिसरातील दोन किलोमीटर अंतरात येणाºया शेतकºयांना त्यांच्या शेतात लावण्यासाठी स्वखर्चाने कामगंध सापळे वितरीत करण्याबाबत कळविण्याच्या सूचनाही कृषी आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत.  

Web Title: Bondali control campaign in 21 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.