तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा
By सुनील काकडे | Published: September 17, 2023 08:32 PM2023-09-17T20:32:45+5:302023-09-17T20:36:24+5:30
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या तथा सध्या ६० ते ६३ वर्षे वय असलेल्या या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणून भेटीगाठीचा सोहळा शाळा प्रशासनानेच आयोजित केला, हे विशेष.
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा येथील जिनवरसा चवरे (जे.सी) शाळेत तब्बल ४४ वर्षांपूर्वी दहावी, बारावीत शिक्षण घेत असलेल्या ९० वर्गमित्र, मैत्रीणींचे तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा ऋणानुबंध जुळले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या तथा सध्या ६० ते ६३ वर्षे वय असलेल्या या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणून भेटीगाठीचा सोहळा शाळा प्रशासनानेच आयोजित केला, हे विशेष.
जिनवरसा चवरे हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजच्यावतीने दहावी, बारावीतील माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेह बंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महेश भवन व शाळेच्या प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्यात ६० ते ६३ वर्षे वयोगटातील ९० मित्र-मैत्रिणी ४४ वर्षांनी पुन्हा एकमेकांना भेटू शकले, एकमेकांशी संवाध साधू शकले. यावेळी सर्वांनी शालेय जिवनातील आठवणींना मनमोकळेपणाने उजाळा दिला.