निराधारांच्या समस्यांवर विचार मंथन
By admin | Published: January 22, 2015 12:14 AM2015-01-22T00:14:35+5:302015-01-22T00:14:35+5:30
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची बैठकीत डफडे बजाव आंदोलनाचा निर्णय.
वाशिम : स्थानिक विश्रामगृहात २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत अपंग व निराधारांच्या विविध समस्या व योजनांवर चर्चा करण्यात आली. अपंग व निराधाराच्या समस्येवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला छावाचे विदर्भ अध्यक्ष गणेश गांजरे, विदर्भ उपाध्यक्ष केशव कांबळे, विदर्भ सचिव प्रकाश खोडके, विदर्भ सहसचिव नामदेव कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख वंदना अक्कर, राज्य संचालिका बालिका होलगरे, जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, जिल्हा सचिव मारोती मोळकर, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.
नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये अपंगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवण्यात यावा, जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणे बाबत, अपंग व निराधार परितक्त्या यांना अंत्योदय व दारिद्रयरेषेखालील कार्ड मिळण्यासंबंधीची माहिती या व इतर अनेक विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व अपंग योजना व अपंगांच्या अनुषंगाने राबविण्यात येणार्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.